ह. भ. प. समाज प्रबोधनकार शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे महाराज प्रस्तुत

“शिवगर्जना”

परिचय

परिचय

शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे

img

अपंगत्वावर मात करीत ते प्रथम शाहीर मग कीर्तनकार झाले !

परिचय
शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे .
जन्मतारीख २५ / १२ / १९७२
शिक्षण B.A.
१९८७ साली जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या हस्ते ‘बालशाहीर’ हा पुरस्कार.
इ.३ री पासून अनेक कार्यक्रमात सहभाग .
१९९५ साली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील पोवाडा संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी यश संपादन केले.एका महिन्यात ५ लाखाहून अधिक कॅसेट कंपनी मार्फत विकल्या गेल्या.
१९९७ साली ‘शिवगर्जना कला मंच’ ची स्थापना.
मुंबईतील अनेक मल्टी नेशनल कंपनी टिप्स,व्हीनस,टी-सिरीज,प्रिझम,फौंटन मध्ये स्वयंरचित १३५ विविध समाजपयोगी विषयावरील ध्वनिफिती (कॅसेट) महाराष्ट्रात प्रकाशित.
आजपर्यंत पोवाडे,कीर्तन,व्याख्यान च्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना जीवन यशस्वीतेसाठी मार्गदर्शन,याच माध्यमातून तब्बल १८ हजार लोक व्यसनमुक्त झाले तर १५ लोक आत्महत्या करण्यापासून परावृत्त झाले.
९ फेब्रुवारी २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार.
आजवर अनेक पुरस्कार प्राप्त.
विशेष कार्यकारी अधिकारी (SPECIAL EXECUTIVE OFFICER) आजीवन पदी निवड
छत्रपती शिवरायांचे चरित्र अनेक देशात गायले,अखाती देश दुबई सारख्या शहरामध्येही कार्यक्रम
अपंगाना आर्थिक,मानसिक,तीन चाकि सायकल,कपडे स्वखर्चाने मदत.
देशातील अनेक दिग्गज मंडळी महाराजांच्या निवासस्थानी भेट देण्यास जातात.
दिल्ली युनीव्हर्सिटी तर्फे शाहिरी क्षेत्रातील भारतातील पहिली मानद डॉक्टरेट पदवी मिळविण्याचा मान.
अपंग,वृद्ध-कलावंत,गरीब विद्यार्थ्यांसाठी MPSC/UPSC मोफत मार्गदर्शन यांसाठी प्रस्तावित शिवाश्रम.