शिवाश्रम
शिवाश्रम

शिवाश्रम

शिवरायांच्या विचारांचे जिवंत स्मारक

” शिवाश्रम “

शिवाश्रम…
ही संकल्पना खरी तर माझे गुरुवर्य कै.शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची आहे.पण आतुन आवाज यायला पाहिजे. 1 मे 2011 रोजी घोटी ता.इगतपुरी येथे एका अपंगाने माझा कार्यक्रम आयोजित केला. आठ दहा दिवस त्याने सर्व गाव पिजुंन काढल आणी कार्यक्रम पार पडला. 3800 रुपये जमा झाले. आणी त्याच क्षणी मनामध्ये ठरवले की आता शिवाश्रम काढुन अंध ,दिव्यांग व वृध्दांसाठी जगायचे. आणी लागलो कामाला. कार्यक्रमातील 25% टक्के रक्कम व गाडीचा वाचलेला डोल बाजुला काढायला सुरवात केली. इतकेच नव्हे तर संजय गांधी निराधार योजनेचे मिळणारे 600 रुपये मानधन सुध्दा त्याच खात्यावर जमा करायला लागलो. 3 डिसेंबर 2016 रोजी शिर्डी जवळ शिवाश्रमाचे भुमीपुजन झाले. शिवाश्रमात अंध दिव्यांग व वृध्द कलावंत आणी ज्या आईवडीलांना त्यांचे अपत्य सांभाळत नाहीत असे आइवडील आनंदाने रहातील. मनाशी एकच ठरवले की कार्यक्रम करुन वैभवात राहीलो तरी आपण एक ना एक दिवस या जगातुन जाणार आहोत. मग असे जाण्यापेक्षा शिवाश्रम तयार करुन गेलो तर यावरही जगतगुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे.
शिवाश्रमा मध्ये अपंग लोकांना रोजगार देउन स्वतःच्या पायावर उभे रहायला प्रेरीत केले जाणार आहे. तसेच शिवाश्रम तर्फे स्पर्धा परीक्षा देणार्या मुलांमुली साठी अकॅडमी ,शाहीरी प्रशिक्षण ,वारकरी संप्रदाय प्रशिक्षण,या सारखे अनेक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. पण या साठी मी एकटा काहीच करु शकत नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याची व आशिर्वादाची नितांत आवश्यकता आहे.

मी जे भोगलय ते इतरांना भोगू देणार नाही अपमानाच जिणं कोणाच्याही वाटयाला येवू नये यासाठी सुरू केलेल्या संघर्षाच दुसरं नाव म्हणजे शिवाश्रम .. माणुस ही निसर्गाची चमत्कारी निर्मीती आहे जगातला कोणताच माणुस एकसारखा नाही . प्रत्येकाचा चेहरा वेगळा .. चालण वेगळ . वागणं वेगळ .बोलणं वेगळ . पण जगातल्या सर्व अपंगाच्या समस्या एकच आहेत मी जन्मजात अपंग नाही पोलीओच्या एका झटक्यात माझ्या जिवनाचे व जगण्याचे संदर्भ बदलून गेले … अंपग हा शब्दच ह्रदयाची चाळणी करतो .. निसर्गानी सर्व वैभव दिल्यानंतर जगण्याचे भान व जिवनाचे ज्ञान जगाच्या बाजारात घेवून उभ्या राहाणाऱ्या शारिरीक अपंग असणाऱ्या अनेकांना अपमानीत होताना मी पाहीतले आहे अनूभवले आहे अपंगत्व केवळ नैसर्गिकच असते असे नाही तर ते कधी कधी लादले जाते आपली कसलीच चुक नसताना झालेल्या घात – अपघातानेही अपंगत्व येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे … अपंग कोणीही असो तो माणुस असतो हे समाज मान्यच करीत नाही त्यांच्या शारिरीक व्यंगाकडे ज्या नजरेने पाहिले जाते तीच मनाची घालमेल करणारी असते … अपंग आहे म्हणजे तो समाजाला कुंटूबाला बोज वाटतो .. . अपंगालाही मन भावना असतात त्याच्या मध्ये एकादी कमजोरी असेल तर काही तरी अदभुत असते हे समाजमान्य करीतच नाही . जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा कोणत्याही क्षेत्रात जा तिथे तुम्हाला अपंग माणसाचे योगदान जाणवेल … सर्वसामान्य मानसापेक्षा जास्त काम करण्याची क्षमता अपंग मानसात असते मात्र त्याला ते सिद्ध करण्याची संधी दिली जात नाही .. काही जणांच्या पायात .. काहींच्या हातात : .. काहीच्या कंठात .. तर प्रत्येकाच्या मनात व मेंदुत नवनिर्मानाचा खजाना असतो … त्यांच्या कल्पना व क्षमता वापरून घेतल्या तर त्याचा फक्त त्यांना फायदा होणार नाही तर समाजाला व राष्ट्राला होईल व अपंग असल्याचा कमीपणा वाटणार नाही पण पण त्यांना संधी देण्याचे कुणाला सुचत नाही . शासकिय निर्णय फक्त नौकरी पुरते आहेत त्यामुळे सर्वाना रोजगार मिळणार नाही प्रत्येकाच्या हाताला काम व परिवारासाठी दाम भेटू शकणार नाही पण असा प्रयत्न कोणी करणार असेल तर त्याच्या मागे उभे राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य नाही का ? होय तो प्रयोग व प्रकल्प उभा करण्याचा संकल्प केला आहे आम्ही देशातल्या पहिल्या अपंगाने अपंगासाठी स्वाभिमानी स्वयं रोजगार निर्मितीचा हा यज्ञ सुरू होतोय साईच्या सानिध्याने पावन झालेल्या शिर्डीच्या भुमित ” शिवाश्रमाच्या ” रूपात .. जिथे पाय नसणारा . हात नसणारा .. एकाच डोळयाने जग पाहाणारा किंवा चालू न शकणारा .. एकाच जाग्यावर बसून राहणारा ज्याला घराने व समाजाने बिनकामाचा ठरवला आहे आशा प्रत्येकात आत्मविश्वास ओतुन त्याला स्वावलंबी बनवणे त्याचा वेळ त्याची कला त्याची कल्पना समाज जिवनात प्रवाहीत करून त्याचे जिवन सुसह्य करणे व समाजाला त्याचे वाटणारे ओझे नाहीसे करून समाजाला हवा हवा वाटणारा माणुस बनवण्याच्या संस्थेचे नाव म्हणजे शिवाश्रम असेल . = इथे किमान लोकांच्या गरजा असलेल्या शंभर हस्त उद्योगाची निर्मिती केली जाणार आहे . या वस्तुना बाजार उपलब्ध करून त्याची विक्री केली जाईल देशी हस्तकलेला मान सन्मान कच्चा माल आपलाच त्याचा वापरही आपण करणार ही भावना स्वदेशी शब्दाचा अर्थ बदलूण टाकेल इथे कोणालाही आपण निरोपयोगी आहेत असे वाटणार नाही … अपंगाच्या समस्या काय आहेत हे त्यांनाच माहीत आहे ज्यांच्या कुंटूबात ते आहेत त्यांना मिळणारी वागणुक त्यांना न होणारे सहकार्य प्रत्येक गोष्टीत दुसऱ्या वर अवलंबुन राहावे लागणे सतत येणाऱ्या अडचणी न निघणारे मार्ग त्यातून येणारे नैराष्य जिवन नकोसे वाटणारे आयुष्य व त्यातून घडणाऱ्या दुर्दैवी घटना यामुळे व्यथित झालेल्या मनाचा अविष्कार म्हणजे शिवाश्रम..

नुकतेच आयकरात सवलत मिळण्याचे 80 G चे प्रमाणपत्र शिवगर्जना कला मंच ला मिळाले आहे. त्याचा नंबर व बॅक खाते नंबर देत आहे.
80 G no. PN/CIT (Exempt.)/Tech/80G/38/2017-18/4768 Date.7/12/2017

शिवगर्जना कला मंच बॅक खाते क्रमांक
स्टेट बॅक ऑफ इंडिया राहुरी शाखा.
Account No. 34969662949 IFSC.SBIN0001042.

शिवाश्रम फौउंडेशन खाते क्रमांक
स्टेट बँक ऑफ इंडिया राहुरी
Account No. 36906944423 IFSC SBIN0001042

2,194 total views, 11 views today