आतंरराष्ट्रीय शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांना *विश्व शिवशाहीर* हा पुरस्कार जाहीर झाला आहे 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे जिजाउ जयंती निमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने छत्रपती खा.उदयनराजे भोसले, छत्रपती खा.संभाजीराजे भोसले, तंजावारचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, माजी खा.नाना पटोले, मधुकर मेहकरे महासचिव मराठा सेवा संघ, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे ,स्वप्निल खेडेकर न्यूयॉर्क अमेरिका व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.पुरुषोत्तमजी खेडेकर आदी मान्यंवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या आधी ही तनपुरे महाराज याना विविध क्षेत्रातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी कल्याण पुरस्कार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे प्रधान करण्यात आला , राज्यस्तरीय मराठा भुषण पुरस्कार, बीड येथे नामदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते कार्यगौरव , वैजापूर येथील शिवशंभुरत्न , शिर्डी येथील साईभुषण, घाटकोपर येथील वारकरी भुषण , हे व असे अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.

तनपुरे यांनी शिवाजी महाराज यांच्यावर पोवडा तसेच स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशाचा नवामंत्र शिवतंत्र, भैय्यु महाराज यांच्या जीवनचरित्रवर , स्व. गोपीनाथ मुंडे, सदगुरु नारायण गिरी महाराज , श्री संत भगवान बाबा यांच्यावर पोवाडे सादर केले गेले आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास परदेशात त्यामध्ये आफ्रिकेत ही महाराजांचा इतिहास शिवशाहीर तनपुरे यांनी पोहोचलो आहे .
अनेक देशात त्यांचे पोवाड्याचे कार्यक्रम गाजले. अपंग असुन आपली जिद्द न सोडता अपंगाना आधार देणारा हा कलंदर शाहीर स्वखर्चाने शिर्डीत अपंगाच्या उत्थानासाठी , कल्याणासाठी शिवाश्रमा सारखा मोठा प्रकल्प उभारत आहे. 25 डिसेंबर 2017 रोजी आपला वाढदिवस 14 दिव्यांगांना तिन चाकी सायकल ,100 अनाथ मुलांना शालेय गणवेश ,100 अनाथ मुलांना ब्लॅकेटस ,वह्या व कुबड्या व्हिलचेअर वाटप करुन साजरा केला.